WHAT IS MASTURBATION? (हस्तमैथुन)
Research presenting a negative correlation between the frequency of masturbation and various mental and physical benefits is not presented in the article
स्वतःच्या जननेंद्रियांना (शिस्न अथवा योनी) विविध प्रकारे उत्तेजित करण्याच्या क्रियेला हस्तमैथुन म्हणतात.[१] बहुतेक वेळा हस्तमैथुनाचा परिणाम लैंगिक उत्कटताबिंदू (इंग्रजी: Orgasm)गाठण्यात होतो. बहुतेक व्यक्ती स्वतःच्या हातांनी, किंवा इतर वस्तूंनी जननेंद्रियांचे घर्षण करून हस्तमैथुन करतात. सहसा 'हस्तमैथुन' शब्दाचा अर्श एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्वतःला लैंगिक उत्तेजित करणे असा होतो. काही वेळा दोन व्यक्तींनी हस्तमैथुनासारख्या क्रिया एकमेकांच्या जननेंद्रियांवर करून, दुसऱ्यास लैंगिक उत्कटता मिळवून देण्याच्या क्रियेस सामायिक हैस्तमैथुन असे म्हणतात. (इंग्रजी: Mutual masturbation)
पौगंडावस्थेत येताच मुलांमध्ये व मुलींमध्ये हस्तमैथुन करण्याची इच्छा नैसर्गिकपणे निर्माण होते. काहीवेळा लैंगिक स्वप्न पडून स्वप्नामध्ये वीर्यस्खलन होऊ शकतं. या सर्व गोष्टी अनेक मुलांमध्ये घडतात. त्यात अघटित असं काही नाही व त्यापासून काही अपायही होत नाही.[२] लैंगिक उत्तेजना दाटली गेली की तिची वाट मोकळी व्हावी म्हणून निसर्गानेच या रचना ठेवल्या आहेत. हस्तमैथून म्हणूनच कुणाकडून शिकावं लागत नाही. अत्यंत स्वाभाविकपणे मुलं ते शोधून काढतात. असं करण्याने त्यांना कोणताही शारीरिक अथवा मानसिक अपाय होत नाही. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. असह्य होत असलेल्या लैंगिक उत्तेजनेला शांत करण्यासाठी जर मुलं हस्तमैथुनाचा अवलंब करीत असतील तर त्यात काहीच गैर नाही. पण नेमकं यालाच गैर, घातक असल्याचं सांगितलं गेल्यास मुलं निसर्गाने योजलेला हा सोपा मार्ग अवलंबण्यास टाळू लागतात. पण मग त्याचा परिणाम हिंसक प्रवृत्ती निर्माण होण्यास होऊ लागतो. काही मुलांमध्ये या व अशा गोष्टींबद्दल प्रचंड न्यूनगंड निर्माण होतो. मुलांमधील हा न्यूनगंड दूर करायचा असल्यास त्यांच्याशी मोकळी व उघड चर्चा करणं गरजेचं असतं.
‘लैंगिकतेचा विकास होत असताना‘ वयाच्या १३-१४ वर्षांपासून, शाळांमधून किंवा पालकांकरवी लैंगिक शिक्षण दिल्याने मुलांमध्ये लैंगिकतेबाबत एक प्रांजळ स्वीकार निर्माण होतो, हे आज जगभर झालेल्या प्रयोगाअंती सिद्ध झालेलं एक वैज्ञानिक सत्य आहे. मुला-मुलींमध्ये वयात आल्यावर होणारे बदल हे जर त्यांना आधीच ज्ञात असतील तर त्या अवस्थेतून जात असताना मुलं त्याचा सहज व स्वाभाविकपणे स्वीकार करायला शिकतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, लैंगिक शिक्षण दिल्यानंतर मुलांमध्ये नको ते धाडसी प्रयोग करण्याची प्रवृत्ती कमी होते व जबाबदार लैंगिक संबंध ठेवण्याचं वय होईपर्यंत थांबण्याचं ‘मनोबल‘ त्यांना प्राप्त होतं. योग्य सूत्रांकडून योग्य माहिती मिळाल्यामुळे चुकीच्या माध्यमातून विकृत माहिती मिळवण्याची प्रवृत्तीही लोप पावते. अशा मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती निर्माण होत नाही. लैंगिक शिक्षण म्हणजे जननेंद्रियांशी केंद्रीत प्रजनन प्रक्रियेची माहिती पुरवणं एवढंच नसून लैंगिकतेच्या मानसिक व भावनिक पैलूंची समग्र माहिती देणं, स्त्री व पुरुष यांच्या लैंगिकतेमधील मूलभूत फरक समजावून देणं, लैंगिक विकासाच्या सर्व अवस्थांचं शास्त्रोक्त विवरण करणं, जबाबदार लैंगिक वर्तन कशाला म्हणतात याचा अर्थ समजावून सांगणं, या सर्व गोष्टी त्यात येतात.
प्रौढ व्यक्तीपैकी ८० ते ९० टक्के लोक कधी ना कधी हस्तमैथुन करतात हे अनेक पाहण्या व शास्त्रीय संशोधनांतून दाखवून दिले आहे. वैवाहीक जोडप्यापैंकीदेखील अनेकजण हस्तमैथुन करतात हे सर्वमान्य आहे.